आखवणे भोम पुनर्वसन गावठाणातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्द ; नितेश राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम प्रकल्पग्रस्थाच्या लढ्यात आम्ही कायम आपल्यासोबत राहिलो आहोत. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनातील प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुनर्वसन गावठाणासाठी लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येईल. असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले. आखवणे भोम पुनर्वसन गावठाणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित प्रचार सभेत आमदार राणे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, हुसेन लांजेकर, स्वप्नील खानविलकर, संजय सावंत, प्राची तावडे, यामिनी वळवी, माजी सरपंच आर्या कांबळे, आकाराम नागप, डॉ जगन्नाथ जामदार, रंगनाथ नागप,संजय नागप, शांताराम नागप,संतोष सुतार, मनोज नागप, रमेश कांबळे यांच्यासह पुनर्वसन गावाठाणातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार राणे पुढे म्हणाले, पुनर्वसन गावाठाणातील सर्व अडचणी मला माहित आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. यापुढेही पुनर्वसनातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण बांधील अहोत. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर कोणीतरी काय तरी येऊन सांगेल. त्याला विचारा बाबा इतके दिवस तू कुठे होता. त्यामुळे आमचं ठरलं आहे. आम्ही भाजपला मतदानं करणार आहोत. या बूथवर जास्तजास्त मतदान भाजपला झाले पाहिजे. असे नियोजन करून कामाला लागा. असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. यावेळी आखवणे येथील उबाठाचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश पांचाळ बुवा यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. आमदार राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. सभेचे सूत्रसंचलन अभय कांबळे यांनी केले.

error: Content is protected !!