श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा येथे दिवाळी अंक प्रदर्शन…!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा येथे नवीन दिवाळी अंकांचे प्रदर्शन सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन देवस्थान समिती सचिव आणि मानकरी संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिपक साटम, वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी,कार्यवाह अर्जुन उर्फ दादा बापर्डेकर,जयप्रकाश परुळेकर,उर्मिला सांबारी,वैशाली सांबारी,दिपाली कावले, भिकाजी कदम,अंजू साटम, ग्रंथपाल विनिता कांबळी,वर्षा सांबारी,वाचनालयाचे महेश बापर्डेकर,समृद्धी बापर्डेकर,स्वप्नील चव्हाण यांसह अन्य वाचनप्रेमी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराच्या वतीने दिवाळीनिमित्त संस्थेच्या सभासदांसाठी फक्त पन्नास रुपयांमध्ये शंभर दिवाळी एक वर्ष या कालावधीसाठी वाचावयास मिळणार आहेत.या दिवाळी अंकात आरोग्य, पाककला, कथा, विनोदी, साहित्य, बालसाहित्य, चित्रपट, ज्योतिष, कला, क्रीडा,मनोरंजन इत्यादी विषयक साहित्य उपलब्ध होणार आहे.तरी जास्तीत जास्त वाचक सभासदांनी वाचनालयाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे कार्यवाह अर्जुन उर्फ दादा बापर्डेकर यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!