वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या प्रचार वक्तेपदी युवा सेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. स्वप्निल धुरी हे शिवसेनचे युवा नेतृत्व असून युवा सेनेचे चिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीतही प्रचार वक्ता म्हणून काम केले आहे. त्याच्या कामाची दाखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाच्या प्रचार वक्ते पदी निवड केली आहे. त्यांनी अलीकडेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आपल्या युवा सेना चिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकाराला नव्हता. त्यांची समजूत काढण्यात आली असून त्यांच्यावर ही वक्ते पदाची मोठी जबादारी दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेले जबाबदारी सर्व वरिष्ठाना विश्वासात घेऊन आपल्या कामातून दाखवून देऊ. असा विश्वास त्यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे.