कणकवली च्या माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर यांचे निधन ; संजय मालंडकर याना पत्नीशोक

गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या माजी नगराध्यक्ष व कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या पत्नी सायली संजय मालंडकर यांचे आज गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस सायली मालंडकर यांच्यावर बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नसल्याने अखेर त्यांचे आज निधन झाले. कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष असताना त्यांनी शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या कणकवलीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!