भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा विश्वास
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमदार म्हणजे नितेश राणे. कणकवली शहरासाठी नगरोत्थान, नागरी अर्थ सहाय्य योजना, जिल्हा वार्षिक पर्यटन योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून सुमारे 60 ते 70 कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध केला. शहरातील विविध रस्ते व इतर विकास कामांसाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या निवडणुकीत कणकवली शहरातून त्यांना दोन हजारांचे मताधिक्य आम्ही मिळून देऊ असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी व्यक्त केला आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाचा वसा उचलत हे शहर राज्याच्या नकाशावर ठळकपणे यावे. यासाठी आमदार राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. कणकवली वासियांना दिलेल्या शब्दांनुसार या शहरात त्यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूल हे सीबीएसई बोर्डाचे स्कूल सुरू केले. शहरवासीयांना दिलेल्या शब्दांनुसार त्यांनी शहरात कृत्रिम धबधबा सुरू केला. कणकवली व जाणवली जोडण्यासाठी गणपती साणा येथे सुमारे आठ कोटी रुपये खर्चाचे ब्रिज मंजूर करून ते पूर्णत्वास नेण्याचे कामही त्यांनी केले.
विविध योजना व लेखाशीर्षांच्या माध्यमातून शहरातील रस्ते सुस्थितीत करण्यासोबतच शहरात तयार करण्यात आलेल्या नवीन डीपी, रिंगरोडसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. शहरातील तरुणांची गरज ओळखून उड्डाणपुलाखाली बंदिस्त क्रिकेट व फुटबॉल मैदान त्यांनी स्वखर्चातून तयार करून दिले. आज कणकवली शहराच्या सौंदर्यात भर घालत असलेल्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेत हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी मोठे योगदान दिले. त्याचबरोबर नरडवे रोडच्या सुशोभीकरणासाठी ही त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून हेही काम पूर्णत्वास नेले आहे.
शहरवासीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने व हे शहर राज्यातील नामांकित शहरांमध्ये गणले जावे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. या शहरात अद्ययावत स्विमिंग पूल व्हावे शहरांमध्ये सुसज्ज बगीचा असावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असून पुढील कालावधीत ही कामे निश्चितपणाने पूर्णत्वास जाणार आहेत. त्याबाबतचे नियोजनही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
म्हणूनच कणकवली शहरांमध्ये आमदार नितेश राणे यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे या पाठिंबाच्या जोरावरच आम्ही शहरातून त्यांना दोन हजारांचे मताधिक्य निश्चितच मिळवून देऊ असा विश्वासही श्री. कोदे यांनी व्यक्त केला.