फणसे गावात भाजपाला हादरा

संदेश पारकर यांना पाठिंबा देत भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : फणसे गावातील थोटम वाडी मधील बीजेपीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश. आपल्या आशीर्वादाने विजय होणार आहे आपल्याला 23 तारीख ला या ठिकाणी या मतदारसंघांमध्ये गुलाल उधळाचा आहे. कारण लोक या सगळ्या कारभाराला यांच्या विरोधकांच्या कारभाराला सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला आपण कंटाळले आहात. गेली 10 वर्षात येथील स्थानिक आमदाराने कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. येथील विकास फक्त सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून संदेश पारकर करू शकतात म्हणुन आम्ही त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहोत असे येथिल प्रवेश कर्त्यांनी संकल्प केला.. प्रवेश कर्त्यांमध्ये मंगेश राऊळ, सतीश गावकर, सतीश थोटम, प्रकाश राऊळ, जितेंद्र थोटम, अमृत थोटम, दिशा थोटम, सूर्यकांत नवलू, दिलीप थोटम, अनिल नवलू यांच्यासह 20 ते 25 जणांनी प्रवेश केला.

यावेळी संदेश भाई यांच्यासोबत विष्णू गाडी, संदीप ढोलकर, अमित फणसेकर, प्रसाद करंदीकर, फरीद काझी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!