निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांचा साळसकर यांना टोला
देवगड (प्रतिनिधी) : निवडणुकिच्या कालावधीमध्ये शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर हे कुठल्याच पक्षाचे नसतात त्यामुळे निष्ठावंतांची भाषा विलास साळसकर यांनी करु नये, मी उध्दव सेनेशी प्रामाणिक आहे पुढेही प्रामाणिक राहिन राजकारण सोडेनपण मी कधीही पक्ष सोडणार नाही असे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांनी विलास साळसकर यांच्यावरती बोचरी टिका केली आहे.
उध्दवसेना गटाचे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगरसेवक विकास कोयंडे, निनाद देशपांडे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नगरसेवक तारी म्हणाले की, विलास साळसकर यांनी आमच्यावरती निष्ठावंताची टिका करु नये, आता पर्यंतच्या निवडणुकिच्या इतिहासामध्ये विलास साळसकर हे ज्या ज्या पक्षामध्ये होते ते त्या त्या पक्षामध्ये कधीही प्रामाणिक राहिलेले नाही. राजकारण हा विलास साळसकर यांचा धंदा आहे. आम्ही कायमच उध्दव सेनेबरोबर राहिलो या पुढे देखील राहणार आम्ही राजकारणाबरोबर देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील विकास कामे करीत आहोत. व अनेक केली आहेत. त्यामुळेच आम्हाला नगरपंचायतीमध्ये सत्ता मिळाली होती. माजी खासदार विनायक राऊत यांना दिल्लीमध्ये भेटून मला उध्दवसेना पक्षामध्ये घ्या अशी विनवणी साळसकर करीत होते. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असल्यामुळे त्यांना पक्षामध्ये घेतले नाही. ते आतापर्यंत कुठल्याच पक्षामध्ये एकनिष्ठ राहिले नाह. त्यामुळे पुन्हा त्यांना उध्दव सेनेमध्ये घेवून ते एकनिष्ठ कसे राहणार असा आरोपही तारी यांनी केला. तसेच माजी नगराध्यक्षा योगेश चांदोस्कर यांनी आमच्यावरती निष्क्रिय असल्याचा आरोप केला आहे. निष्क्रिय कोण आहेत. हे देवगड जामसंडे जनतेने दाखविले आहे. त्यामुळेच योगेश चांदोस्कर यांचा नगरपंचायतीच्या निवडणुकिमध्ये पराभव होवून त्यांच्या पक्षाची सत्ता गेली त्यामुळे निष्क्रिय कोण आहेत हे त्यांना जनतेने दाखवून दिले आहे. आणि यापुढे देखील येथील जनता असाच धडा शिकविणार असल्याचे नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांनी सांगितले.











