फडणवीस, शिंदे ,पवार यांचा शपथविधी ; कणकवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

कणकवली (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कणकवली शहरातील पटवर्धन चौकात फटाके फोडून एकच जल्लोष केला. 5 वर्षानंतर पुन्हा राज्याची सूत्रे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज हाती घेतली.राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री बसल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे माजी नगरसेवक अभय राणे, शिशिर परुळेकर , भाजपा जिल्हा प्रसिद्धिप्रमुख बबलू सावंत, विजय चिंदरकर, सागर राणे अभय गावकर नंदू वाळके ,चानी जाधव, मंदार सोगम , प्रसाद देसाई , गणेश तळवडेकर, सुदेश देसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!