मालवण दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये अधिवक्ता दिवस व भारतीय संविधान दिवस साजरा

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुका अधिवक्ता परिषद यांच्या वतीने मालवण येथील दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये अधिवक्ता दिवस व भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र रावराणे, मालवण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता सतीशकुमार धामापूरकर,उपाध्यक्ष अधिवक्ता मिलिंद सुकाळे , सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अधिवक्ता गिरीश गिरकर , सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्या अधिवक्ता सौ. लता कुबल/ मोंडकर, अधिवक्ता परिषद मालवण तालुका अध्यक्ष अधिवक्ता प्रदीप मिठबांवकर, त्याचप्रमाणे मालवण येथील जेष्ठ अधिवक्ता समीर गवाणकर सर, अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर,अधिवक्ता सुदर्शन गिरसागर,अधिवक्ता सुभाष प्रभूखानोलकर, अधिवक्ता श्रीम. माधवी बांदेकर,अधिवक्ता रश्मी मोंडकर, अधिवक्ता हर्षद तरवडकर,अधिवक्ता सुमित जाधव, अधिवक्ता हरेश्वर गरगटे, अधिवक्ता कन्हैया निवतकर,अधिवक्ता मानसी चव्हाण,अधिवक्ता अक्षय पवार,अधिवक्ता काजल झाड,अधिवक्ता मानसी चव्हाण तसेच मालवण तालुक्यातील अभिवक्ता उपस्थित होते.

यावेळी” भारताच्या संविधानाची चौकट देशाला अविरतपणे परिपूर्ण लोकशाही मार्गाने नेणारी आहे” असा विचार अधिवक्ता राजेंद्र रावराणे यांनी मांडला.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून अत्यंत परिश्रमपूर्वक केलेली संविधानाची निर्मिती खंडप्राय भारताला उज्वल भवितव्याकडे नेणारी आहे.” असे प्रतिपादन अधिवक्ता सतीशकुमार धामापूरकर यांनी केले तसेच ” भारताचे संविधान नागरिकांनी स्वतः प्रत अर्पण केलेले आहे त्यामुळे संविधानाची जपणूक त्याच्या पावित्र्याची जपणूक याची प्रत्येक भारतीयाने जाणीव जोपासली पाहिजे, ” . यावर अधिवक्ता समीर गवाणकर यांनी प्रकाश टाकला.

सदर कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रास्ताविक अभिवक्ता मालवण तालुका अध्यक्ष प्रदीप मिठबांवकर यांनी केले, त्यानंतर अधिवक्ता सुभाष प्रभूखानोलकर यांनी भारतीय संविधान प्रास्तविका याचे वाचन केले. या कार्यक्रम प्रसंगी अधिवक्ता राजेंद्र रावराणे , अधिवक्ता समीर गवाणकर , अधिवक्ता सतीशकुमार धामापूरकर यांनी भारतीय संविधान तसेच अधिवक्ता दिवस यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर यांनी मानले.

error: Content is protected !!