निकृष्ट कामाची चौकशी व्हावी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांची मागणी
देवगड (प्रतिनिधी) : देवगड पंचायत समितीतील सिलिंग अचानक कोसळल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. सदरची घटना गुरुवारी दुपारी ३:०० ते ३:३० सुमारास घडली.मात्र या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळस्कर यांनी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार देवगड पंचायत समितीचे कौलारू इमारतीवरील अंतर्गत शुशोभीकरणाचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले होते . यावेळी इमारतीच्या छताला पूर्णतः सिलिंगचे काम करण्यात आले होते. मात्र गुरुवारी अचानक यातील सिलिंगचा भाग कोसळला . हा कोसळलेला सीलिंगचा भाग आता मांजराने उडी मारल्यामुळे कोसळल्याचे सांगितले जात आहे .मात्र या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केली आहे.












