कॅन्सरग्रस्त कु.काव्या शेळकेला कणकवली गौरव गवाणकर मित्रपरिवाराकडून जीवनावश्यक वस्तू आणि रोख ३५०००/- मदत
माणुसकीचा पाझर फुटला …मदतीचा ओघ सुरू झाला
कणकवली (प्रतिनिधी) : मालवण आचरा येथील अवघ्या तीन वर्षाची मुलगी कु काव्या शेळके हिला ब्लड कॅन्सर गोवा येथे उपचार सुरु आहेत. पालकांची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मदतीचे आवाहन ‘आपल्या सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज’ ने सर्वप्रथम केले होते.या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आणि दातृत्वाच्या भावनेने मदतीचा हात कणकवली शहरातील गौरव गवाणकर मित्रपरिवाराच्या वतीने देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर, मिंगेल मंतेरो, महेश नार्वेकर, आनंद पारकर, जय शेट्ये, रवी बाणे, संजय पारकर, भालचंद्र नार्वेकर आदींनी गोवा येथे शेळके कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कु.काव्या शेळकेच्या कुटुंबाला रोख रक्कम 35000 रू. आणि तांदूळ, डाळ, तेल, अन्य जीवनावश्यक वस्तू स्वरूपात कुटुंबाला मदत करून धिर देत कु.काव्याला लवकरात बरी होण्यासाठी शुभकामना व्यक्त केल्या आहेत.नेहमीच गरूजूंसाठी मदतीला धावणा- या कणकवली शहरातील या सामाजिक कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांना धन्यवाद दिले जात आहे.
कणकवली शहरातील दानशूर सामाजिक कार्यकर्त्याप्रमाणे इतरांनाही कॅन्सरग्रस्त कु.काव्या शेळकेच्या कुटुंबाला मदत करायची असेल तर पुढील मोबाईल नंबर अथवा बॅक खात्यात मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बँक तपशील👇
नाव :- सेजल चंद्रशेखर शेळके
बँकेचे नाव :- बँक ऑफ इंडिया
शाखा :- आचरा
आय एफ एस सी कोड :- BKID0001472
खाते क्रमांक :- 147210110006561
गुगल पे क्रमांक
संतोष शेळके -9359917346
अधिक माहितीसाठी संपर्क
चंद्रशेखर शेळके – 9420822659












