कोल्हापूरचा बॉडी बिल्डर सुहास खामकरची बॉलिवूडमध्ये एंट्री

हिंदी चित्रपट राजवीर २० डिसेंबरला प्रदर्शित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या सुहास खामकरची बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री झाली आहे. त्याची प्रमुख भूमिका असणारा राजवीर चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.मूळचा शरीरसौष्ठ खेळाडू असणाऱ्या सुहासने कित्येक शरीरसौष्ठ स्पर्धांमध्ये जिल्ह्याबरोबर देशाचेही नाव उंचावले आहे. त्याची उंची आणि शरीरयष्टी एखाद्या नायकाला लाजवेल अशीच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांना नायक म्हणून तू शोभशील, अशी शाबासकी दिली होती. मात्र खेळानंतर सरकारी नोकरीत तो हजर झाला. त्यानंतर विविध कथानक त्याच्यासमोर घेऊन निर्माते येत होते पण त्याला ते आवडले नाही. राजवीर या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला ही कथा त्याला आवडली आणि त्याने होकार दिला. ड्रगमाफियाविरुद्ध लढा देणारा पोलिस अधिकारी अशी भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे देशाबरोबर परदेशातही चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाचे निर्माते साकार राऊत, ध्वनी राऊत, गौरव परदासानी, सूर्यकांत बाजी आहेत. दिग्दर्शक म्हणून यांनी साकार राऊत आणि स्वप्नील देशमुख यांनी काम पाहिले आहे. तीन गीते असणाऱ्या या चित्रपटात झाकीर हुसेन, गौरव परदासानी, प्राशी अवस्थी, धीरज सानप, साईनाथ बाजी, पृथ्वीराज पोतनीस, विष्णू मिश्रा, जेम्स डिकोस्टा, विमल सूचक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शरीरसौष्ठव खेळाडू, सरकारी नोकरी अशा ठिकाणी आपली छाप पाडलेला सुहास नक्कीच चित्रपटसृष्टीला आपली दखल घेण्यास भाग पाडेल. या संदर्भात ते म्हणाले, माझी शरीरयष्टी नायकाशी साजेशी असल्याने चित्रपट अभिनेता बनलो. मात्र या निमित्ताने समाजाला चांगले काय देता येईल, आपल्यातील अनुकरण युवा पिढी कसे करेल किंवा त्यांनी आत्मसात करावे, या ध्येयाने सिनेमा केला. यामुळे समाजात थोडाफार जरी फरक पडला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन.

पहिलाच प्रयोग

चित्रपटाचे प्रमोशन अथवा म्युझिक लाँच नेहमीच हॉटेलमध्ये किंवा मर्यादित लोकांच्या समोर होतो. मात्र राजवीर या चित्रपटाचा म्युझिक लाँच मिरजकर तिकटी येथे रविवारी रात्री झाला. त्याला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!