खारेपाटण (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियाना अंतर्गत कणकवली तालुका भाजप मंडलातील कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच दि.२१ व २२ मार्च २०२६ रोजी तळेरे येथे संपन्न झाले.
या प्रशिक्षण वर्गाला माजी आमदार अजित गोगटे,माजी आमदार प्रमोद जठार,माजी तालुका अध्यक्ष संतोष कानडे,डॉ. मिलिंद कुलकर्णी,सोशल मिडिया जिल्हा संयोजक कृष्णा परब, भाजप कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर विद्यमान जि.प. सदस्य मनोज रावराणे, जिल्हा चिटणीस संदीप मेस्त्री यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे कणकवली मंडल च्या वतीने स्वागत केले. यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्य प्राची ईसवलकर,यांसह कणकवली मंडल मधील आजी माजी जि.प.आणि पं.स.सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.












