पुस्तकांनशी मैत्री झाल्यामुळे नैराश्यातून बाहेर पडलो – आनंद चिंदरकर
आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरचा ‘चोखंदळ वाचक’ पुरस्कार २०२५-२६ वाचनालयचे वाचक आनंद धाकू चिंदरकर यांना आचरा जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी व ग्रंथालय सहकार्यवाह सिध्देश गोलतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, शब्दांच्या पलीकडले – लेखक सुरेश ठाकूर गुरुजी,आठवणींच्या हिंदोळ्यावर लेखक उज्वला धानजी, कर्तव्य पूर्ती – लेखक दत्तात्रय हिर्लेकर सर यांनी दिलेली पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना आनंद चिंदरकर म्हणाले की, मी उत्कृष्ट तबला मेकर म्हणून काम करायचो, तदनंतर मला कर्णबधीर पणा आला व व्यवसाय करणारे मालक यांचा धंदा बंद झाला. त्यातून नैराश्याने घेरलो गेलो. जवळच वाचनालय असल्याने पुस्तके वाचण्याची सवय लागली. आणि नैराश्यातून बाहेर येऊन पुस्तक मित्र झालो. आज माझ्याकडे पुस्तकांच्या ज्ञानाची शिदोरी आहे. तसेच चिंदर यांनी पुरस्कार दिल्या बद्दल वाचनालयाचे आभार मानले.
यावेळी ग्रंथालय अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, पं.स.सदस्य दिपक सुर्वे, उपाध्यक्ष संतोष पाताडे, खजिनदार देवेंद्र हडकर, कार्यवाह हेमांगी खोत, ग्रंथपाल स्वरा पालकर, हिमाली अमरे, गोपाळ चिंदरकर, रावजी तावडे, विकास पाताडे, अशोक पाताडे, संतोष अपराज, सागर अपराज, चिन्मयी पाताडे, धनश्री भावे,मंगेश वरक, बाबू जंगले, रणजित दत्तदास, विभावरी चव्हाण, निशिगंधा वझे,भालचंद्र गोलतकर, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्र संचालन कार्यवाह हेमांगी खोत यांनी केले. तर आभार सिध्देश गोलतकर यांनी मानले.










