एकरी नृत्य स्पर्धेत वर्षा रोठे हिस सुवर्णपदक तर समूह नृत्य स्पर्धेत कांस्य पदक
खारेपाटण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय नगरी सेवा यांच्या वतीने दि.९ मार्च २०२६ रोजी विनय मार्ग स्पोर्ट्स कॉम्लेक्स,नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत नृत्य स्पर्धेत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय स्तरातील संघाने एकरी नृत्य वेस्टर्न डान्स प्रकारात वर्षा रोठे यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले.तर समूह नृत्य प्रकारात महाराष्ट्र संघाने कांस्य पदक पटकावले.संकृतील विभागात यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र शासन संघाच्या मानद सचिव मंगल नाखवा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
एकरी नृत्य प्रकारात गृह विभाग मंत्रालय मुंबई च्या वर्षा रोठे यांनी सहभाग घेतला होता.तर समूह नृत्य प्रकारात.उमेश कांबळे (महसूल व वन विभाग मंत्रालय) प्रितेश रावराणे (जलसंपदा विभाग,मंत्रालय), अमोल कांबळे (वस्तू व सेवा कर विभाग कोल्हापूर) सागर ठाकरे (गोसीखर्द,उपसा सिंचन मंडळ, अंबाडी भंडारा),प्रणिता सुजी (जे जे रुग्णालय मुंबई) सुरभी भंडारकर(सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय)श्रीम.प्रियंका ठाकरे, नम्रता चौगुले(बॉम्बे सिव्हिल कोर्ट,मुंबई) आदी कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला होता.
केंद्र शासनाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा संगीत नृत्य स्पर्धेत एकेरी नृत्य स्पर्धेत एकूण ११ राज्यांनी सहभाग घेतला होता.तर समूह नृत्य स्पर्धेत एकूण १४ राज्यांनी सहभाग घेत आपली कला सादर केली होती. महाराष्ट्र संघाच्या या कलाकारांना नृत्य दिग्दर्शक दिनेश चोरगे व योगेश पाटणकर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.












