खारेपाटण मध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडूनव जिलेबी वाटून साजरा केला आनंदोत्सव
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेमध्ये संघातील महायुतीचे भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सायंकाळी मंत्रिपदाची प्रथचच शपथ घेताच खारेपाटण येथील भाजप व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडून व नागरिकांना जेलिबी वतीने आनंद व्यक्त केला.
यावेळी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच रमाकांत राऊत, भाऊ राणे,माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,कणकवली तालुका ओबीसी महिला आघाडी सेल प्रमुख उज्ज्वला चिके,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई,सुधाकर ढेकणे,गुरुप्रसाद शिंदे,मनाली होनाळे,खारेपाटण गाव तनातमुळती समिती अध्यक्ष प्रणय गुरसाळे,भाजप कार्यकर्ते राजेंद्र वरुणकर,बाळा रोडी,देवानंद ईसवलकर,बूथ अध्यक्ष शेखर कांबळे,गौरव ढेकणे,तसेच भाजप युवा कार्यकर्ते गणेश कारेकर,अजिंक्य देवस्थळी,अजित गुरव,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल खारेपाटण एस टी बस स्थानक येथे कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांचा जयघोष करीत व एकमेकाला पेढा भरवून तर फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.












