कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल नामदार नितेश राणेंचे वैभववाडी तालुकावासीयांकडून अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नामदार नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे व सहकाऱ्यांनी नागपूर येथे भेट घेत भगवद्गीता व पुष्पगुच्छ देऊन नितेश राणे यांचे वैभववाडी तालुक्याच्या वतीने अभिनंदन केले.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, वाभवे वैभववाडी उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे व भाजपा पदाधिकारी राजेंद्र राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!