कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक एकता मंच सिंधुदुर्ग ची सभा शासकीय विश्रामगृह कणकवली येथे संपन्न झाली . सदर सभेत *परभणी गंगाखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या विटंबना झाल्याच्या निषेधार्थ* सोमवार दिनांक 23 / 12 /2024 रोजी दुपारी 3:00 (तीन)वाजता प्रांताधिकारी कणकवली यांना निवेदन देण्यात येणार आहे . प्रांताधिकारी यांना निवेदन देवुन झाल्यानंतर हातात संविधानाच्या प्रति घेवुन रॅली प्रातांधिकारी कार्यालया कडुन पटवर्धन चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर बुद्धविहाराएस टी स्टॅन्ड कणकवली पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे .सदर रॅली मध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचाराच्या विविध संघटना , संविधान प्रेमी ,स्थानिक गाव मंडळे , धार्मिक संघटना , सामाजिक परिवर्तनवादी संघटना आणि कर्मचारी संघटना पदाधिकार , पुरोगामी राजकीय नेते उपस्थित रहाणार आहेत . आजच्या सामाजिक एकता मंच चे जिल्हा सचिव समाजभूषण संदीप कदम , संजय (छोटु )कदम राज्याध्यक्ष रोहिदास समाज महाराष्ट्र , अंकुश कदम अध्यक्ष कणकवली कणकवली बौद्ध महाल संघ , सी आर चव्हाण जिल्हाध्यक्ष रोहिदास समाज सिंधुदुर्ग, सुजित जाधव जिल्हाध्यक्ष चर्मकार उन्नती मंडळ , संजय पेंडुरकर महासचिव भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग , अभिजित जाधव महासचिव कास्ट्राईब शिक्षक संघटना , सुधीर जाधव , शशिकांत मुणगेकर , प्रशांत तांबे , संजय दाजी कदम , स. शी.कदम ,ए सी पवार , अजितकुमार देठे आदी प्रमुख संघटना पदाधिकारी उपस्थित होते .