जिल्हा पोलीस दल व रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय यांचा पुढाकार
ओराेस (प्रतिनिधी) : रक्तकेंद्र व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे सध्या रक्तसाठा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने रक्तकेंद्र व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग येथे दिनांक 17.12.2024 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या रक्तदान हे काळाची गरज बनलेली आहे, कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजाराचे वाढणारे प्रमाण, वारवारं होणारी अपघात, शस्त्रक्रियाचे वाढते प्रमाण तसेच थैलेसिमिया, हिमोफिलिया सारख्या आजारामध्ये रक्ताची दिवसेंदिवस गरज वाढत आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांना जीवदान ठरणारे व मानव हिताचे कार्य करण्यासाठी मिळालेली एक अमूल्य संधी आहे हे जाणून सिंधुदुर्ग पोलीस दलातील एकुण 26 अधिकारी व अमंलदार यांनी रक्तदान करून शिबीरात सहभाग घेतला.