खासदार विनोद तावडे यांचे हरेश जनक यांनी केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर युवा उद्योजक हरेश जनक यांनी खासदार विनोद तावडे याना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदन केले. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात आपली वर्णी लागू दे अशी सदिच्छाही जनक यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार विनोद तावडे यांच्या माध्यमातून नव्याने हातभार लागेल अशी अपेक्षाही जनक यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!