फोंडाघाट (कुमार नाडकर्णी ) : फोंडाघाट- हवेलीनगर येथील ग्रामस्थ, राजाराम तथा बबन बालेघाटकर यांच्या मातोश्री सुशीला गोविंद बालेघाटकर ( वय 85 ) वर्षे यांचे वृद्धापकाळतील प्रदीर्घ आजारात राहत्या घरी दुःखद निधन झाले. सिंधुदुर्ग बँकेच्या फोंडाघाट शाखेतील ज्येष्ठ लिपिक नीतिशा बालेघाटकर यांच्या या सासूबाई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई- सून- नातवंडे असा परिवार आहे. निधनाबद्दल परिसरात शोक व्यक्त होत आहे.












