फोंडाघाट- पिंपळेश्वर येथे श्रीबाळूमामा पालखी सोहळा पायी वारी चे उत्साहात स्वागत !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र दाभोळे येथून प्रस्थान केलेल्या आदमापूर येथील श्रीसंत बाळूमामाच्या पालखी पायवारीचे फोंडाघाट मध्ये आगमन होताच, फोंडावासीय भाविकांनी वारीचे भक्तिभावाने स्वागत केले. बाळूमामाच्या कवणाद्वारे आणि विठ्ठलाच्या जयघोषात बाजारपेठेतून पिंपळवाडी- पिंपळेश्वर येथे पिंपळेश्वर तरुण मंडळातील अबाल वृद्ध आणि युवाई ने स्वागत केले. पिंपळेश्वर पारावर पालखी विसावली. त्यानंतर पादुकांची यथासांग पूजा करून सर्वांनी आरती केली. आणि भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. महाप्रसाद झाल्यानंतर पालखी वारीने पुढील मुक्कामी प्रस्थान केले. पिंपळवाडी आणि पिंपळेश्वर तरुण मंडळ तील युवाई आणि भाविकांनी सोहळ्याचे नेटके संयोजन करून पालखीचे आशीर्वाद मिळविले.













