लिटिल फ्लावर इंग्लिश मिडियम स्कूल, फोंडाघाटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2024-25 दिमाखात संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : लहानपणापासूनच मुलांचा आत्मविश्वास, बुजरेपणा नाहीसा होण्यासाठी या स्पर्धा नक्कीच उपयोगी पडतील. खेळातून मुला- मुलींचे आरोग्य सुदृढ होऊन स्वावलंबनाची ऊर्जा आणि त्यातून त्यांच्या बुद्ध्यांक वर्धन साठी महत्त्वाच्या ठरतील, असे उद्गार फोंडाघाट लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा स्पर्धा 2024-25 च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना चेअरमन महेश सावंत यांनी व्यक्त करून, शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धेचे प्रायोजक सरपंच सौ. संजना आग्रे आणि उद्योजक दत्तगुरु सामंत प्रमुख अतिथी होते. संस्थेचे संचालक शेखर लिंग्रस, विठोबा तायशेटे आणि सदस्य रंजन नेरूरकर, बबन पवार, मनीष गांधी, सदानंद हळदिवे, सुंदर पारकर, मुख्याध्यापक रासम व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
प्रथमच रात्रौ पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेला, पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. सरपंच संजना आग्रे यांनी “लिटिल फ्लावर्स ” चे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते, प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन, गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रभारी प्राचार्य करुणा चींदरकर यांनी केले. तर सूत्रसंचालन गौरी गावकर आणि आभार प्रदर्शन नीलाक्षी चव्हाण यांनी केले. सहाय्यक शिक्षिका विनया लिंग्रस, श्वेता शिंदे, प्राजक्ता लाड, कर्मचारी उर्मिला कुशे, व्हॅन ड्रायव्हर इत्यादींनी, स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अनमोल सहकार्य केले..
उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.