कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील जेष्ठ नागरिक आणि जुन्या हाॅटेल व्यावसायिक सुहासिनी सुर्यकांत मुंज (वय-८० वर्षे) यांचे रविवारी रात्री कणकवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मैत्री परिवाराच्या सदस्या असलेल्या सौ.समिता मुंज-ढवण यांच्या आई आणि ठाणे -मिरा रोड तसेच नागवे येथील प्रसिद्ध उद्योजक दिलीप ढवण यांच्या सासूबाई होत. त्यांच्या निधनाने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.











