सि ए तन्वी यांचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केले अभिनंदन

ओरोस (प्रतिनिधी) : तन्वी कदम यांनी पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल परीक्षेत मिळविलेले यश हे आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. अत्यंत काठिण्य पातळीवरील सि ए परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड असले तरी अभ्यासातील मेहनत जिद्द आणि सातत्य या त्रिसूत्री ने यश साध्य करता येते हे तन्वी हिने कृतीतून दाखवून दिले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी तन्वी हिने मिळविलेले यश स्फूर्ती आणि प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी काढले. ओरोस येथील सिद्धी असोसिएटस चे सर्वेसर्वा प्रख्यात सिव्हिल इंजिनीअर तथा शासकीय ठेकेदार संतोष कदम आणि डॉक्टर श्रेया कदम यांची सुकन्या तन्वी हिने सि ए अंतिम परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी तन्वी हिची ओरोस येथील निवासस्थानी भेट घेत तिचे अभिनंदन केले. यावेळी तन्वी हिचे वडील इंजिनीअर संतोष कदम, आई डॉ श्रेया कदम, पिडब्ल्यूडी उपअभियंता विनायक जोशी, चालक शैलेश कांबळे उपस्थित होते.

error: Content is protected !!