मत्सोद्योगमंत्री नितेश राणेंनी सि ए तन्वी चे केले विशेष अभिनंदन
कणकवली (प्रतिनिधी) : तन्वी कदम सारखे हिरे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऍसेट आहेत. तन्वी ने मिळवलेले यश हे सर्वांना पथदर्शी आहे अशा शब्दांत मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी तन्वी हिचे अभिनंदन केले.सि ए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सुयश मिळविल्यानंतर तन्वी हिने वडील संतोष कदम यांच्यासह मंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी तन्वी हिला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.












