मसूरे (प्रतिनिधी) : गोळवण – सावरवाडी येथे सत्यविजय साबाजी पालव यांच्या काजू फळबागेमध्ये HORTSAP अंतर्गत काजू शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांच्या हस्ते काजू रोपाचे पूजन करून तसेच त्याची लागवड करून करण्यात आले.या काजू शेतीशाळा कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी आर. एस. चव्हाण, कृषि पर्यवेक्षक डी. के. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तालुका कृषि अधिकारी एकनाथ गुरव यांनी काजू मोहर संरक्षणा बद्दल शेतकऱ्यांना काजू फळबागे मध्ये विस्तृतरित्या मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे सरपंच सुभाष लाड म्हणाले. यावेळी उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्या चिरमुले मॅडम , ग्रामपंचायत सदस्य गावडे, ग्रामसेविका शेलटकर मॅडम तसेच गावातील सर्व मान्यवरांची व शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.













