मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी ते त्रिंबक रस्त्यावर पडलेले खड्डे बांदिवडे ग्रामस्थ संघामार्फत श्रमदान करून यावर्षीसुद्धा बुजविण्यात आले. सदर रस्त्याची मागील आठ ते दहा वर्षे कोणतीही डागडूजी न झाल्यामुळे त्याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. सदर मार्गावरून अनेक विद्यार्थी सायकलने नेहमी प्रवास करत असतात. तसेच या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ सुद्धा असते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनलेला होता. वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. बहुसंख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून रस्त्यांवरील खड्डे नुकतेच बुजविले.
यावेळी सरपंच आशु मयेकर,बांदिवडे सोसायटी अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, संघाचे अध्यक्ष आनंद परब, विलास परब, उदय सावंत, उमेश परब, रामचंद्र माळकर, संदिप घाडीगावकर, सतिश आईर, केशव परब, दिनेश परब, चंद्रकांत परब, हनुमंत आईर प्रशांत परब, बाबाजी परब, रमेश मेस्त्री, मंगेश राणे, सुभाष परब, प्रमोद परब, हर्षल प्रभू, अनुष परब, संजय बांदिवडेकर, शैलश राणे, उत्तम परब, सुनिल घाडी, सुधीर घाडीगावकर, अभिजीत घाडीगावकर, पुष्पक घाडीगावकर, भूषण परब, विनय घाडी, तन्मय आईर, तुकाराम घाडी , राजेश घाडी, करण घाडी, सत्यवान सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. संघाच्या वतीने उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आनंद परब यांनी आभार मानले.











