मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मौजे तिरवडे येथे संजय विश्वनाथ गावडे यांच्या काजू बागेमध्ये ‘महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत आंबा, काजू मोहोर संरक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग व ग्रामपंचायत तिरवडे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. या आंबा काजू मोहर संरक्षण कार्यक्रमाला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ् गोपाळ गोळवणकर, मंडळ कृषी अधिकारी मालवण एस. जी. परब, सरपंच तिरवडे रेश्मा उमेश गावडे, उपसरपंच सुशील गावडे, ग्रा. पं. सदस्य सुमित मेस्त्री, विनया गावडे, विशाखा गावडे, तंटा मुक्ती अध्यक्ष सत्यविकास गावडे, निवृत्त शिक्षक संतोष दत्तात्रय गावडे (गुरुजी), वरिष्ठ शेतकरी व माजी सरपंच मनोहर तुकाराम गावडे, सिआरपी लक्ष्मी जामसंडेकर, कृषी सहाय्यक सौंगडे, कृषि सेवक नितेश पाताडे, आणि मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. शाश्त्रज्ञ गोपाळ गोळवणकर यांनी काजू फळपिकावर येणाऱ्या कीड रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना, ढेकन्या (T-Mousquito), फुलकीड, फळ पोखरणारी आळी ई. किडीविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यावरील नियंत्रणाचे उपाय सांगितले. तालुका कृषि अधिकारीएकनाथ गुरव यांनी आंबा मोहर संरक्षणा बद्दल शेतकऱ्यांना आंबा -काजू फळबागे मध्ये विस्तृतरित्या मार्गदर्शन केले. तसेच सर्व बागायतदार शेतकऱ्यांनी “आंबा फळमाशी रक्षक सापळ्यांचा” वापर करावा असे आवाहन केले. कृषी विभागातील इतर योजनाची माहिती सौंगडे कृषी सहाय्यक तिरवडे यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच कृषी विभागामार्फत आंबा बागेमध्ये फाळमाशी नियंत्रणासाठी “फळमाशी रक्षक सापळे” शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले. संजय गावडे यांचे बागेमध्ये जाऊन शेतकऱ्यांना शाश्त्रज्ञामार्फत फळपिकावरील कीड, रोगाची माहिती देऊन शेतकऱ्यांचे शंका समाधान करण्यात आले. त्यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी कृषी विभागाचा हा खुप छान उपक्रम असून यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना खुप लाभ होईल असे मनोगत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक, तिरवडे सौंगडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत तिरवडे सरपंच, उपसरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तिरवडे येथे आंबा-काजू मोहोर संरक्षण कार्यक्रम !











