कणकवली (प्रतिनिधी) : ‘युवा दिनाचे’ औचित्य साधून कणकवली कॉलेज, कणकवली आणि युवा संकल्प प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एच.पी.सी.एल. हॉल, कणकवली कॉलेज कणकवली येथे सकाळी ७.३० वा. ते दु.२.०० वाजे पर्यंत हे शिबीर असून कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. होणार असून विजयकुमार वळंजू सचिव, शि.प्र.मंडळ, कणकवली कॉलेज, कणकवली, संदीप चव्हाण,सचिव, युवा संकल्प प्रतिष्ठान, कणकवली, मारुती जगताप, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन, कणकवली आनंद जाधव अध्यक्ष, युवा संकल्प प्रतिष्ठान, कणकवली प्रा. डॉ. राजश्री साळुंखे चेअरमन, शि.प्र.मंडळ, कणकवली कॉलेज, कणकवली मा.प्रा. युवराज महालिंगे प्रभारी प्राचार्य, कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम पार पडणार आहे. या उपक्रमास हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युवा संकल्प प्रतिष्ठान, कणकवली कणकवली कॉलेज, कणकवली, राष्ट्रीय सेवा योजना यांनी केली.