कासार्डे विद्यालयाला एनसीसी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांची भेट

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त महत्त्वाची – लेफ्टनंट कर्नल मंडलिक

तळेरे (प्रतिनिधी) : एनसीसी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन एनसीसी कॅडेटस् आणि शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय छात्र सेनेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी व शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले असून कासार्डे माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त दिसून आली असे गौरवोद्गार लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांनी काढले.

याप्रसंगी कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर, संस्था पदाधिकारी तथा माजी सैनिक रवींद्र पाताडे,पदाधिकारी सुभाष पाताडे, प्रकाश तिर्लोटकर, सुभेदार बी.डी. साहु,जे.एस नेगी, पर्यवेक्षक एस .व्ही.राणे, कासार्डे विद्यालयाचे एनसीसी शिक्षक तथा एएनओ यशवंत परब आदीसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकात प्रकाश तिर्लोटकर यांनी आजच्या पिढीत शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेचे संस्कार एनसीसी सारख्या शिस्तबद्ध प्रकारातून रूजवले जात आहेत असे सांगत सैनिक आपल्या मातृभूमीचे अहोरात्र रक्षण करत असल्यामुळेच आपण सुरक्षित असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी आनंद कासार्डेकर यांनीही मनोगत व्यक्त करुन एनसीसी अधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांनी केले. याप्रसंगी लेफ्टनंट तनुज मंडलिक यांचे शाळा व संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय विद्यालयाचे एनसीसी शिक्षक यशवंत परब यांचाही लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!