कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश उर्फ पपी मधुकर सापळे ( वय 45, रा. शिवाजीनगर असलदे, मूळ रा.फोंडघाट ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने 13 जानेवारी रोजी दुपारी पावणे दोन वाजता वैद्यकीय उपचारादरम्यान आकस्मिक निधन झाले. नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने 13 जानेवारी रोजी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन करत असतानाच महेश सापळे यांना चक्कर आली. त्यांना लागलीच कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच पपी सापळे यांचे निधन झाले. याबाबत खबरअजित प्रकाश सापळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.
नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष महेश सापळे यांचे आकस्मिक निधन











