कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरानजीक पुन्हा अंदर बाहर जुगार अड्डा सुरू झाला असल्याची चर्चा असून खाकी वर्दी च्या नजरेआड दरदिवशी काही हजारोंची उलाढाल यातून सुरू असल्याचे बोलले जात आहे. कणकवली शहरानजीक नावात मठ असलेल्या गावात हा जुगार अड्डा सुरू झाल्याचे समजत असून आडनावात “बाग” आणि हाय ” वे ” असलेला या जुगाराचा सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कणकवली शहरातील जंगलमय भागातही बैठकीच्या जागा बदलून जुगार अड्डा भरवला जात असल्याची चर्चा शहरात आहे. खाकी वर्दी कडून अवैध धंद्यांना थारा नाही असे असताना खाकी वर्दी च्या नजरेआड अंदर-बाहर जुगार खेळवला जात असल्याचे म्हटले जात आहे. या जुगारींवर वेळीच कारवाई होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया जनमाणसांत व्यक्त होत आहे
कणकवली शहरात आणि शहरानजीक पुन्हा अंदरबाहर जुगार सुरू










