फोंडाघाट – गांगोवाडी येथील संकेत धोंडू चव्हाण यांना डॉक्टरेट !

पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट- गांगोवाडी येथील संकेत धोंडू चव्हाण यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयांमध्ये नुकातीच पीएचडी पूर्ण करून फोंडाघाट तसेच गांगोवाडी ची शान वाढवली आहे. डॉ. संकेत चव्हाण यांनी गोविंद वल्लभ पंत कृषी व औद्योगिक विश्वविद्यालय, उत्तराखंड येथून पीएचडी नोंदणी पूर्ण करून “फळभाज्यांवरील किमती भारतातील मार्केट व परदेशी मार्केट या संदर्भात आयात व निर्यात” या महत्वपूर्ण विषयावरील भविष्यातील धोरण कसे असेल ? यावर संशोधन केले आहे.

डॉ. संकेत चव्हाण हे मूळचे घाट पायथ्याशी बसलेल्या फोंडाघाट गांगोवाडी, तालुका- कणकवली येथील रहिवासी असून ते सध्या रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर डेव्हलपिंग कंट्रीज,आर. आय. एस. नवी दिल्ली येथे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा, गांगोवाडी आणि माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट मध्ये झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण एस. एम. कॉलेज कणकवली व पदवी शिक्षण कृषी महाविद्यालय, दापोली येथे झाले. पुढे पदवी तर पदवीसाठी पंजाब युनिव्हर्सिटी मधून त्यांना स्कॉलरशिप मिळाली.

घरची परिस्थिती बेताचीच त्यात पीएचडी दरम्यान दोन वेळा डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्या. तरीही अत्यंत हलाकीच्या आर्थिक व शारीरिक परिस्थितीवर, जिद्दीने मात करून त्यांनी हे उत्तुंग यश संपादन केले. पीएचडी पूर्ण करीत असताना, तुम्हाला आर. आय. एफ मध्ये सल्लागार म्हणून नोकरी मिळाली हे समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आयुष्यात खूप अडचणी असून देखील त्यांचा सामना करून त्यावर मात करत, डॉक्टर संकेत चव्हाण यांनी हे यश मिळवले आहे. त्यांनी घेतलेल्या या शिक्षणाचा आदर्श नवीन पिढीसाठी प्रोत्साहनपर ठरणार आहे त्यांच्या या यशात त्यांचे काका निळकंठ शंकर चव्हाण, त्यांचे आई-वडील, आजी व भाऊ त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पीएचडी संपादन केल्याबद्दल डॉक्टर संकेत धोंडू चव्हाण यांचे नातेवाईक व मित्रांनी अभिनंदन केले. तसेच फोंडाघाट पंचक्रोशी मध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!