आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी देवस्थान पळसंबचा वार्षिक (जत्रौत्सव) दशावतार नाट्यप्रयोग 20 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून रात्रौ 11 वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा नाट्य प्रयोग श्री जयंतीदेवी रंगमंचावर होणार असून या नाट्य प्रयोगाचा सर्व नाट्य रसिंकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.













