दर्द से हमदर्द ट्रस्ट संस्थे मार्फत ॲड. प्रकाश साळसिंगिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. श्रीराम चिंदरकर यांचा यशस्वी युक्तिवाद
आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तानाजी दिलीप सावंत, ( राहणार- वायंगणी, मालवण ) आपल्या पत्नीसह उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात मुंबई येथे दिवा, ठाणे शहर येथे राहण्यास होता. जून 2022 रोजी मुंब्रा पोलिसांनी सदर इसमास अटक करत त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणे या गुन्ह्या अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 376, 376(n), 377, 363 आणि कलम 4 Pocso अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नोकरीच्या शोधात शहरात आलेला हा युवक अत्यंत गरीब असल्यामुळे तसेच घरची परिस्थिति देखील सामान्य असल्यामुळे गेली अडीच वर्षे तो वकील न लावू शकल्यामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद होता. “दर्द से हमदर्द ट्रस्ट” च्या स्वयंसेवकांना तो तळोजा कारागृहात भेटला होता व त्याने कारागृहातून बाहेर काढण्याची विनंती केली. संस्थेमार्फत आरोपीतर्फे अँड. श्रीराम चिंदरकर यांनी अँड. प्रकाश साळसिंगिकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची संपूर्ण केस चालवली व ठाणे विशेष सत्र न्यायालयाने दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सदर गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या केस मध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकीलांनी जे साक्षीदार तपासले त्या आधारे प्रॉसिक्युशन गुन्हा सिद्ध करण्यास या केस मध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकीलांनी जे साक्षीदार तपासले त्या आधारे प्रॉसिक्युशन गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरले व तपासण्यात आलेले साक्षीदार देखील सरकारी पक्षाला भक्कम आधार देऊ शकले नाहीत. याचाच आधार घेत बचाव पक्षाने न्यायालयात आरोपीची बाजू मांडली.
बचाव पक्षाचे वकील यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, सरकारी पक्ष असा एकही साक्षीदार तपासू शकला नाही व असा एकही ठोस पुरावा देऊ शकला नाही ज्यातून आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होईल व त्या आधारे आरोपीला सिद्ध दोषी पर्यन्त नेता येईल. तसेच आरोपीला खोट्या प्रकारे या गुन्ह्यात गुंतवण्यात आले असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध खोटे पुरावे रचल्याने आरोपीच्या निर्दोष सुटकेची मागणी आरोपीचे वकील यांनी विशेष सत्र न्यायालया समोर केली. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर सत्र न्यायाधीश ए.एस. भागवत यांनी बचाव पक्षाच्या बाजूने निर्णय देत सदर केस मधून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
अशा प्रकारे अनेक आरोपी हे पैशांच्या अभावी स्वताचा वकील देवू शकत नसल्यामुळे गेली कित्येक वर्षे विविध जेल मध्ये खितपत पडले आहेत. अशा अनेक गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी “दर्द से हमदर्द संस्था” संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे. “न्याय हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि पैशाच्या अभावी तो कोणीही काढून घेऊन शकत नाही” हे या संस्थेने पुन्हा एकदा करून दाखवले आहे. आता पर्यन्त अशा ६०० पेक्षा जास्त गरीब आणि गरजू व्यक्तींना संस्थेमार्फत विविध कारागृहांतून विनामूल्य सोडवण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश साळसिंगिकर यांनी दिली.













