संकेत शेट्ये यांचा नितेश राणेंच्या पालकमंत्री पदाचा बॅनर ठरला खरा

खारेपाटण एसटी स्टँडवर आमदारपदी निवडून आल्यावर लावला होता बॅनर

खारेपाटण (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा विजयी होत विजयी हॅट्ट्रिक साजरी करताच संकेत शेट्ये यांनी खारेपाटण एसटी स्टँडवर नितेश राणे पालकमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करणारा बॅनर लावला होता. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकाल लागला. त्याचवेळी संकेत शेट्ये यांनी नितेश राणे यांचे पालकमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन चा बॅनर झळकवला होता. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी आमदार नितेश राणे यांची मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्रीपदी निवड करण्यात आली. आणि 18 जानेवारी रोजी नामदार नितेश राणेंकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. नितेश राणे यांची पालकमंत्री पदी निवड होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याच वेळी विधानसभा निकाल लागून आमदार पदी निवडून आल्यानंतर लगेच नितेश राणे यांचे पालकमंत्री म्हणून अभिनंदन करणारा संकेत शेट्ये यांनी लावलेल्या बॅनरवरील मजकूर पावणे दोन महिन्यांनी सत्यात उतरल्याची चर्चाही सुरू होती.

error: Content is protected !!