जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती खेड्यापाड्यात होणे आवश्यक – तहसिलदार विरसिंग वसावे

कुडाळ हायस्कूल येथे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आयोजित

एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा उत्फूर्त प्रतिसादात संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा 2013 याची खेड्यापाड्यात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे यांनी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आयोजित एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी केले. यावेळी कुडाळ पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम, कुडाळ हायस्कूल मुख्याध्यापक महेश ठाकूर, अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड राजीव बिले, जिल्हा संघटक विजय चौकेकर, जिल्हा सरचिटणीस प्रा.अजित कानशिडे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.संजिव लिंगवत, जिल्हा संघटक रूपाली पाटील, कुडाळ तालुकाध्यक्ष ॲड समिर कुळकर्णी, प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डाॅ रूपेश धुरी, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे, क्रेडाई सिंधुदुर्गचे गजानन कांदळगावकर, कुडाळ रोटरी सेवा प्रतिष्ठानचे राजन बोभाटे, ,कुडाळ कार्याध्यक्ष सचिन मदने, महिला संघटक उज्वला येळाविकर, कणकवली तालुकाध्यक्ष भगवान तांबे, देवगड उपाध्यक्ष कांबळे, वेंर्गुला उपाध्यक्ष सिमंतनी मयेकर, कुडाळ सचिव ॲड. हेमांगी वराडकर, खजिनदार ॲड. गौरी आपटे, कुडाळ उपाध्यक्ष ॲड. संजय खानोलकर, संघटक ॲड. राजीव कुडाळकर, सावंतवाडी संघटक नयना पांचाळ, कणकवली संघटक स्नेहा महाडिक, सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनर्स असोसिएशनचे आंबेरकर, कल्याण कदम आदी उपस्थित होते.
अंधश्रध्दा निर्मूलन जनजागृतीसाठी पोलिसांचे सर्वोतोपरी सहकार्य करणार – पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम जादूटोणा विरोधी कायदा 2013 व वैज्ञानिक दृष्टीकोन -जनजागृती साठी पोलिस कर्मचा-यांचे सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन कुडाळ पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले. आमचे कार्य अंधश्रध्दा निमूर्लनबाबत जनजागृती करणे आहे कोणाला संपवणे नाही – जिल्हाध्यक्ष ॲड.राजीव बिले अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गचे कार्य हे समाजामधील सुरू असलेल्या अंधश्रध्दा निर्मूलनबाबत जनजागृती करणे आहे कुणाला संपवणे नाही. महात्मा गांधीजींच्या आश्रमात न जाता आसाराम बापू सारख्या भोंदू महाराजांच्या आश्रमाकडे लोक जास्त गर्दी करून जातात हे दुर्देव आहे. वेंगुर्ला येथील 16 वर्षीय जटायुक्त त्रस्त मुलीला जटामूक्त करून नवीन आयुष्य अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गकडून देण्यात आले हे आमचे कार्य आहे.अशा अनेक ज्वलंत अंधश्रध्देबातची उदाहरणे देत संघटनेचे कार्य अधोरेखित करतानाच युवकांनी पुढे येवून संघटनेचे सदस्य व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले यांनी व्यक्त केले. अंगात येणं हा मानसिक आजार आहे ,समाजातील गरिब – श्रीमंत रूढींमध्ये अंधश्रध्दा दूर होणे आवश्यक – मानसोपचारतज्ज्ञ डाॅ रूपेश धुरी अंगात येणं हा मानसिक आजार आहे तो वैद्यकीय दृष्ट्या सिंध्द झाला आहे पण समाजात याबाबत असलेली अंधश्रध्दा दूर होणं आवश्यक आहे ,समाजातील गरिब – श्रीमंत रूढीमध्ये लपलेली अंधश्रध्दा दूर होणे आवश्यक आहे.मूक्या प्राण्यांचा बळी देवून मनातील विश्वास नि भावना पूर्ण करणे ही अंधश्रध्दा दूर होणे आवश्यक , अशा अनेक दैनंदिन उदाहरणे देत मानसिक आरोग्य आणि अंधश्रध्दा या विषयावर मार्गदर्शन सिंधुदुर्गचे प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डाॅ रूपेश धुरी यांनी केले. मूठ मारणे, जादूटोणा,करणी अंधश्रध्देच्या प्रात्यक्षिकासह जादूटोणा कायदा सविस्तर माहिती शाळांशाळांमध्ये देणे आवश्यक- जिल्हा संघटक विजय चौकेकर मूठ मारणे, जादूटोणा, करणी, मंत्र तंत्र, देवी अंगात येण, अघोरी प्रथा ,बुवाबाजी अशा अनेक अंधश्रध्देबाबत प्रात्यक्षिकासह जादूटोणा कायदा 2013 ची जनजागृती शाळाशाळांमध्ये होणे आवश्यक असल्याचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिक कार्यशाळेची वैशिष्टये –
▪️उदघाटनवेळी तेलाशिवाय समई प्रज्वलन प्रात्यक्षिकाची सुरूवात
▪️जादूटोना विरोधी कायदा 2013 पुस्तिका देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
▪️अंधश्रध्दा व वैज्ञानिक दृष्टीकोन बाबत विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन
▪️कार्यशाळेस सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र देवून सन्मानित केले गेले.
▪️सिंधुदूर्ग जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील जागृत लोकांची उपस्थिती लक्षणीय

वैज्ञानिक दृष्टीकोन विषयावर संत राऊळ महाराज महाविद्यालयचे प्राध्यापक तथा जिल्हा सचिव अजित कानशिडे यांनी मार्गदर्शन केले. तर भूताटकी आणि अंधश्रध्दा विषयावर जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले, साप आणि अंधश्रध्दा वर सर्पमित्र अनिल गावडे, विविध श्रध्दा – अंधश्रध्दा विषयावर जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गचे कार्य कौतुकास्पद – पोलिस उप अधिक्षक विनोद कांबळे कार्यशाळेस पोलिस उप अधिक्षक विनोद कांबळे यांनी सदिच्छा भेट देत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गचे कार्य कौतुकास्पद आहे.समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा 2013 ची जनमाणसात प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे.यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य देवू असे आश्वस्त उप अधिक्षक विनोद कांबळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले तर आभार ॲड समिर कुलकर्णी यांनी केले.

error: Content is protected !!