पुन्हा बेरोजगारी पासून वाचवा…!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने निवेदन…!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना बेरोजगार होण्या पासुन वाचण्यासाठी नुकतेच कौशल्य प्रशिक्षणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे कि, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व शिकाऊ प्रशिक्षणार्थी आपले आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या उपक्रमामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर आम्हाला कामाचा अनुभव मार्गदर्शन शिक्षणाद्वारे मिळत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सर्व शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आस्थापनेवर आमची निवड केली आहे. आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी कार्यालयात ऑगस्ट २०२४ / सप्टेंबर २०२४ पासून रुजु झालेले आहोत. आम्ही ग्रामीण व शहरी भागातील प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना त्या आस्थापने मधील कामाचा संपूर्ण अनुभव पूर्ण जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सदर योजनेमुळे शेकडो स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळाल्यामुळे सरकारचे आम्हाला कौतुक वाटते. परंतु प्रशिक्षणाचा कालावधी हा फक्त सहा महिने म्हणजेच जानेवारी २०२५ / फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण होत असून आम्ही पुढील सहा महिन्यांनंतर करायचे काय ? असा प्रश्न आम्हा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पडला आहे.

आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहोत याची चिंता आम्हाला होत आहे. बेरोजगार होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पुनश्च रोजगाराची संधी मिळावी. व आमची पुढील भविष्याची दिशा निश्चित व्हावी. तरी कृपया वरील विषयावर व संदर्भावर विचार करून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सहकार्य करावे. तसेच आपण आमच्या भविष्याचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

यावेळी स्नेहा कासार, अनिकेत तावडे, निकिता मयेकर, भूषण परब, हर्षिता मानगावकर, साईप्रसाद बीजीतकर, सुमित साटविलकर, शांभवी निमनकर, निवेदिता देसाई, सुशांत कासलकर, लतिका मोरे, आणि इतर युवक युवती उपस्थित होते.

error: Content is protected !!