फोंडाघाट पत्रकार संघातर्फे सिंधू. अधि. अभियंता सर्वगोड यांचा हृद्य सत्कार ! अन् भावी वाटचालीस शुभेच्छा !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : माझ्या प्रशासकीय कारकीर्दीत, माझ्या विभागातर्फे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरीच कामे केली. यामध्ये शासनाच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, कार्यालयातील स्टाफ पासून स्थानिक नेत्यांपर्यंत, तसेच नागरिकापर्यंत सर्वांनी योग्य सहकार्य केले. तसेच जिल्हा- तालुका पत्रकारांपासून अगदी ग्रामीण भागातील पत्रकारांनी कामाबाबतीत सूचना करून मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे विकास कामामधील माझा प्रवास सकारात्मक आणि जिल्ह्याची पर्यटनामध्ये वेगळी ओळख करणारा ठरला, असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी काढले व फोंडाघाट पत्रकारांचे आभार मानले…
फोंडाघाट पत्रकार संघ आणि संघातील सर्व सदस्यांतर्फे, अध्यक्ष संजय सावंत आणि कुमार नाडकर्णी यांनी सर्वगोड यांची रेस्ट हाऊस वर भेट घेतली. त्यांच्या संकल्पनेतून फोंडाघाट रेस्ट हाऊस येथे स्थापित स्वर्गीय वाजपेयी यांच्या प्रतिमेसमोर, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीसाठी ऊर्जा आणि निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या…
यावेळी सर्वगोड यांच्या कामाचे आणि माणूस म्हणून सकारात्मकतेचे कौतुक करून कुमार नाडकर्णी यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.आज सर्वगोड यांच्या ग्रामीण भागातील कामावर आम्ही पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. टीका टिप्पणी ही केली. परंतु त्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून योग्य बदल करून न्याय दिला. असे संजय सावंत यांनी सांगताना सर्वगोड यांना शुभेच्छा दिल्या.










