पेडणेकर परिवाराचा बाजारपेठेत गोंधळोत्सव, मंगळवार तारीख २१ जानेवारीला !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा म्हणजे जागरण गोंधळ ! यामध्ये आपली इच्छा पूर्ण झाल्यावर अथवा स्मरण म्हणून भवानी आईचे गुणगान गोंधळ्या मार्फत करून सर्व त्यामध्ये लिन होतात.असाच गोंधळोत्सव फोंडाघाट मधील पेडणेकर परिवारातर्फे मंगळवार तारीख २१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी सुरेश पेडणेकर यांच्या घरी आयोजित केला आहे. या आई अंबाबाईच्या जागर-गोंधळा निमित्त सायंकाळी चार वाजता हळदीकुंकू, रात्र सात नंतर जोगवा, दिवटी प्रज्वलन, ओटी भरणे आणि जागर गोंधळा निमित्त कथा आयोजित केली आहे. तरी सर्व भाविकांनी महिला-पुरुषांनी यामध्ये सहभागी होऊन, उत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे….










