वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी तालुका शिवसेना उबाठा शाखेत साजरी करण्यात आली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवा सेना सचिव स्वप्निल धुरी, जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप सरवणकर, महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकुडे,नगरसेवक मनोज (बंड्या) सावंत, लाेरे विभाग प्रमुख सूर्यकांत परब, वैभववाडी महिला शहरप्रमुख मानसी सावंत, उपविभाग प्रमुख
यशवंत गवाणकर, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, राजेश तावडे,उपविभाग प्रमुख स्वप्निल रावराणे, युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार,कोळपे सरपंच सुनील कांबळे,सोनाळी शाखाप्रमुख अनिल कदम, कोकिसरे शाखाप्रमुख अनंत नादल्सकर, दिलीप पवार, राजाराम गडकर आदी. उपस्थित हाेते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी तालुका शिवसेना उबाठा शाखेत साजरी











