तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठ पासून ते हवेलीनगर या भागात व्यापारी तसेच औद्योगिक निर्मिती करणारे प्रकल्प आहेत .येथे दाट लोकवस्ती असून दिवसागणित त्यात वाढ होत आहे. या ठिकाणी विजेचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने,विजेच्या अनिश्चित खंडित होण्याने समस्या जाणवत आहेत. या मार्गावर थ्री फेज लाईन ओढण्याची मागणी यापूर्वी अनेकदा वीज वितरण कार्यालय, कणकवली येथे करून सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही.
त्यामुळे येत्या दोन दिवसात फोंडा बाजारपेठ ते हवेली नगर- धनगर वाडा येथे विजेची थ्री फेज लाईन ओढण्यात आली नाही तर, वीज वितरण कार्यालयासमोर शिवसेना उबाठा महिला आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वजा निवेदन कार्यकारी अभियंता कणकवली यांना देण्यात आले.
तसेच फोंडाघाट बाजारपेठेत सगळीकडून वाहतूक पर्यटक जड वाहतूक वाढल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या गंभीर होत आहे. सिरीयस अपघाती पेशंटची रुग्णवाहिका, बसेस, पर्यटक यांना वाहतूक खोळंबल्याने त्रासाला सामोरे जावे लागते. सीसीटीव्ही कित्येक वर्ष बंद आहेत. त्यामुळे कंट्रोल रूम हात वर करण्यास मोकळे झाले आहे. तरी बाजारपेठेमध्ये ट्राफिक पोलीस तातडीने देण्याची व्यवस्था व्हावी.अशी मागणी वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
संबंधिताकडे निवेदन सादर करताना उबाठा शिवसेनाचे पदाधिकारी नीलम पालव ,वैदेही गुडेकर,दिव्या साळसकर, प्रतिभा अवसरे, संजना कोलते, माधवी दळवी इत्यादी उपस्थित होते…












