“मैत्री पुष्प” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला
कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट पाचवे टुगेदर रंगले देवगड-तारामुंबरी येथे
तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे सलग पाचवे गेट टुगेदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या देवगड – तारामुंबरी येथील निसर्गरम्य अशा ओशियन व्ह्यूव रिसाॅर्टमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मैत्री परिवाराचे हे पाचवे गेट टुगेदर चांगलेच अविस्मरणीय ठरले. विशेष म्हणजे “मैत्री पुष्प” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि योगा नृत्य हे यावेळचे खास आकर्षण ठरले.
मैत्री परिवारातील मित्रमैत्रिणींना एकत्रित आणून वर्गातील सखे, सखी एकमेकांना भेटणार यांचे औत्सुक्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करता यावा.तसेच काही आनंदाचे क्षण मनसोक्तपणे एकत्रितपणे घालविता यावेत.जेणेकरुन त्यातून जीवनामध्ये नवीन उर्जा मिळेल,उत्साह निर्माण व्हावा हीच या मागील प्रमुख संकल्पना होती. पण म्हणतात ना मैत्रीची ओढ कधी स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे सर्व मित्रमैत्रिणींना पाचव्या गेटटूगेदरचे वेध अगोदरच लागले होते आणि मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.
काहींनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून आयोजनापर्यंत सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. ती उत्तमपणे पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यात प्रामुख्याने महेंद्र सांब्रेकर,संजय खानविलकर,जयराम डामरे, संतोष घाडीगांवकर,दीपा नारकर,सरिता काणेकर,गीता पाटकर,सुरेखा मेजारी, यांनी विशेष मेहनत घेतली.मुंबई,ठाणे,पुणे,कोल्हापूर तसेच अन्य ठिकाणाहून व जिल्ह्यातील विविध भागामध्ये नोकरी,धंदा,व्यवसायामध्ये बिझी असणाऱ्या मित्रमैत्रिणी निव्वळ मैत्रीच्या ओढीने एकत्रित झाल्या होत्या.सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी काही मित्र-मैत्रिणींनी सर्वांशी संपर्क साधून मैत्रीसेतू बनण्यासाठी आग्रही भूमिका बजावली.आपल्या मित्र-मैत्रिणींचे चांगले मनोरंजन व्हावे तसेच सर्वांची राहण्याची जेवणाची आणि येण्या-जाण्याची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी योग्य नियोजन केले होते.
कार्यक्रम स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. चहा,नाश्ता,जेवण यामध्येही वैविध्यता ठेवण्यात आली होती.तसेच कणकवली वरुन नियोजित देवगड तारामुंबरी याठिकाणी येण्याजाण्यासाठी काही मित्रांनीच आपल्या चारचाकी वाहनांची सोय उपलब्ध करून दिली होती.
पहिल्या दिवसाची सुरुवातीला देवगड पवनचक्की आणि गार्डनमध्ये तसेच निसर्गरम्य समुद्र किनारा, सुर्यास्त दर्शनाचा आनंद घेतला. त्यानंतर श्रीफळ वाढवून, दीपप्रज्वलन आणि सौ.दीपा नारकर हीने शंख नाद करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी दिवंगत मित्र सुबोध कुडतरकर व सुलेखा राणे या दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. योगगुरू दीपा नारकर हीने अप्रतिम असे योगा नृत्य सादर करुन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तसेच योगा टीमने संगीताच्या तालावरती सुंदरसे एकत्रित योग नृत्याविष्कार सादर केला. त्यानंतर कराओके मराठी,हिंदी गाण्याची सुरेल मैफिल रंगली होती.त्यानंतर महेंद्र सांब्रेकर,जयराम डामरे,राजेंद्र हिंदळेकर,संजय राणे, मनोज निग्रे,संजय सावंत,रामचंद्र सुकाळे, महेंद्र कदम,सरिता काणेकर,अर्चना मोरजकर यांनी सुंदर गाण्याची पेशकश सादर करुन सर्वाची मने जिंकली.
रात्रीच्या जेवणानंतर खरी रंगत आणली ती मैत्री परिवारातील मित्र अजित लाड,मंगेश वाळिंबे आणि शंकर गोसावी अप्रतिम दशावतारी नाटक वेशभूषेसह सादर करुन सर्वाचे चांगलेच मनोरंजन केले तसेच त्यांना संगीत साथ दिली ती संतोष दळवी,बाळू पाताडे,संतोष तळेकर, संतोष गरुड यांनी.सर्वांनी उत्तम प्रतिसाद देत या आनंद सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात गप्पागोष्टी मारत समुद्र किनारी फिरण्याचा आनंद घेतला. तसेच योगगुरू दीपा नारकर हीने सर्वांसाठी योगासन वर्ग घेतला. तसेच योगाचे महत्त्व,आवश्यकता,गरज तसेच योगाच्या माध्यमातून आजार मुक्त शरीर कसे ठेवले पाहिजे याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रत्यक्षात प्रात्यक्षिके दाखवून सर्वांकडून योगासने करून घेतली. त्यानंतर चहा, नाष्टा तसेच कुणकेश्वर मंदिर दर्शन घेतले गेले.
यावेळी विशेष आकर्षण होते ते दर महिन्याच्या २१ तारखेला लिहिले गेलेल्या एकूण पंचवीस मैत्री पुष्पांचे पुस्तक स्वरुपात पुस्तक छापून त्याचा प्रकाशन सोहळा महेंद्र सांबरेकर आणि दीपा नाडकर्णी यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मैत्री परिवारातील मित्रमैत्रिणींना त्याचबरोबर गेल्या वर्षभरात ज्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस झाले त्या सर्वांचा एकत्रितपणे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच मैत्री भेट म्हणून कडूनिंबाचे झाड भेट देऊन त्या झाडाचे रिसॉर्टच्या परिसरू वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट,लगोरी,एका काडीत मेणबत्या पेटविणे,संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद घेण्यात आला.विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.दोन दिवस आपल्या रोजच्या व्यापातून व ताण तणावातून मुक्त होत आनंदात,मजेत,धमाल मस्तीत गेल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.दुसऱ्या दिवशी सायंकाळी सर्वांनाच आपआपल्या घरी परत जाण्यासाठी परतीचे वेध लागले.पुढच्या वर्षी असेच पुन्हा एकदा भेटण्याचा निश्चय करून सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाले.
या गेटटूगेदरमध्ये प्रामुख्याने महेंद्र सांब्रेकर,जयराम डांबरे,संजय खानविलकर,शांताराम पाताडे,संजय सावंत,लक्ष्मण मोंडकर,शरद राणे,मधुसुदन राणे,संतोष तळेकर,अजित लाड,प्रदिप धुरी,संतोष दळवी,महादेव तेली,शंकर गोसावी,मंगेश वाळिंबे, सुनील रावराणे, कुडतरकर,आत्माराम पडते, मनोज सावंत,महेंद्र कदम,संतोष गरुड,किशोर राऊत,सुधीर कदम,विश्वास जाधव, राजेंद्र हिंदळेकर,संतोष राणे,राजेंद्र जाधव,संतोष घाडीगावकर,रामचंद्र
सुकाळे,राजेंद्र पारकर,संजय राणे,सरिता काणेकर,दीपा नारकर,गीता पाटकर,सुरेखा मेजारी,प्रफुल्लता राणे, सुजाता नलावडे,अर्चना मोरजकर,दीपा नाडकर्णी,प्रणिता गावडे,मीना पारकर,वनिता सावंत,रत्नप्रभा तावडे,ज्योत्स्ना मेस्त्री,वैशाली कोरगांवकर आदी मैत्री परिवारातील मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते.












