काहीही लागले तरी हाक द्यावी. आम्ही तुमच्या बरोबर आहोत – डॉ जी. टी. राणे, कुडाळ
जीवन आनंद संस्थेच्या सर्वच आश्रमात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : ” संदिप परब हे या मातीतले आहेत.समाजातील वंचितासाठी आयुष्यभर कार्य करीत राहण्याचा संकल्प करण्याची ताकद हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या लोकांमधे असते.आणि ती हिम्मत संदिप परब यांनी दाखविली.तुमच्या हातून होत असलेल्या कार्याला,तुमच्या धडपडीला हातभर लावणारे हात दिवसेंदिवस वाढत राहो.आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत.”..असे प्रतिपादन डॉ जी. टी. राणे (हृदय रोग तज्ञ कुडाळ ) यांनी सविता आश्रम पणदूर येथील ध्वजारोहण कार्यक्रमात केले.
डॉ. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविता आश्रम पणदूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन सविता आश्रम पणदूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रम प्रसंगी संविता आश्रम-पणदुर, कै सुप्रियाताई वैगुर्लेकर पुनर्वसन केंद्र- अणाव व सक्षम आश्रम-किनळोस येथील बांधव व कर्मचारी सहभागी झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संदिप परब सर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन महाबळेश्वर कामत व सचिन पडते यांनी केले. जीवन आनंद संस्थेच्या सर्व आश्रमात ध्वजारोहण संपन्न.
समर्थ आश्रम, विरारफाटा, ता.वसई जि.पालघर येथे उद्योजक अरूण पालव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे विश्वस्त नरेश चव्हाण, प्रदन्या राणे, किसन चौरे यांचेसह मुंबई विभागातील कार्यकर्ते भाईदास माळी, दिपक अडसुळे, सुनिता भंडारी, दिपाली मेघा माळी, गोविंद मार्गी,चंदा छेत्री हे उपस्थीत होते. तर गोवा पर्रा येथील संवेदना आश्रमात प्रकाश सांगोल्डकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.प्रस्तावना दिप्ती जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद आंगणे यांनी केले. यावेळी चुरी मॅडम आणि आश्रमातील भगीणी उपस्थीत होत्या. तसेच गोवा फोंडा येथील माँ आसरोघर आश्रमात विजय धोपेश्र्वर यांच्या हस्ते धवजारोहण करण्यात आले. सूत्र संचालन श्रेयस मेस्त्री यांनी केले. माँ आसरोघर येथील बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

















