श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक् सचिव अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार प्राप्त यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार हडपीड खालचीवाडी शाळेला Aquaguard भेट दिला आहे.
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील परिषद प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळावे या हेतूने रुपये 22000/ किमतीचा (UF+UV+zink and copper booster) एक्वागार्ड शाळेला प्रदान केला. त्यामुळे नियमितपणे शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आता शुद्ध पाणी मिळणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रचना राजाराम कडू, उपाध्यक्ष संजय लवू राणे व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यार्थी व पालकांनी ऋण व्यक्त केले.














