कणकवली तालुक्यातील 1672 लाभार्थ्यांना मिळणार प्रधानमंत्री आवासचे घरकुल – मिलिंद मेस्त्री

कणकवली (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 11000 हून अधिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुल यादी ड मध्ये शिल्लक असलेल्या घरकुलांना ही मंजुरी मिळाली असून त्यात कणकवली तालुक्यातील 1672 लाभार्थ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागात प्रत्येकाला स्वतःचे घर असावे या उद्देशाने या योजनेची व्याप्ती वाढवलेली असून कणकवली तालुक्यातील प्रलंबित प्रकरणाला मंजुरी मिळाल्याने आम्ही केंद्र व राज्य सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानतो असे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सरकार स्थापन झाल्यानंतर ग्रामीण भागातील प्रत्येकाला हक्काची घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवली. प्रत्येकाला घर मिळायलाच हवे या उद्देशाने आता ड यादीमध्ये शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. सन 2024-25 या आर्थिक वर्षात 11881 एवढे उद्दिष्ट प्राप्त झालेले होते. त्यापैकी 605 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली होती. आता उर्वरित 11 हजार 276 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यात कणकवली तालुक्यातील 1806 ते लाभार्थी उद्दिष्ट होते. त्यातील 135 प्रकरणी यापूर्वी मंजूर होती. तर 1672 प्रकरणांना आता मंजुरी मिळाली आहे. ही घरकुले पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासकीय पातळीवर प्राप्त झाले आहेत. आतापर्यंतच्या घरकुल योजनेमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शिल्लक घरकुलांना देण्यात आलेल्या या मंजुरीमुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे असेही श्री मेस्त्री आणि म्हटले आहे.

error: Content is protected !!