वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्यावतीने शासकीय आधारभूत भात खरेदीचा शुभारंभ दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भुईबावडा सोसायटीच्या गोडाऊनमध्ये माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे व्हाईस चेअरमन अंबाजी हुंबे, व्यवस्थापक सिद्धेश रावराणे तसेच सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. तसेच या भात खरेदी केंद्राचा लाभ भुईबावडा परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन तालुका संघाच्यावतीने चेअरमन प्रमोद रावराणे, व्हा. चेअरमन अंबाजी हुंबे यांनी केले आहे.
भुईबावडा येथे भात खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे भुईबावडा दशक्रोशीतील शेतकऱ्यांना सोईचे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












