त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त ११२७ दिव्यांचा दीपोत्सव साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर शहरामध्ये प्रथमच काल दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त 1127 दिव्यांचा दीपोत्सव साजराकरण्यात आला या कार्यक्रमादरम्यान राजेंद्र नगर मधील बहुजन समाजातील शेकडो महिलांनी सहभागी होऊन त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या त्यागासाठी एक दिवा त्यागाचा लावून अभिवादन करण्यात आले.

तसेच स्वराज्य तालीम मंडळाच्या चौकामध्ये भव्य अशा फुलांची रांगोळी काढून त्याच्यामध्ये दिव्यांची सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या भरारी शहर स्तरीय संस्था (CLF)च्या अध्यक्षा आयु. अनिता गवळी मॅडम व समता सैनिक दलाच्या महिला प्रमुख आयु. ज्योती डोंगरे मॅडम व सुनीता खिल्लारे मॅडम,तसेच मंडळाच्या प्रमुख महिलांच्या वतीने फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. नंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून जमलेल्या सर्व माता-भगिनींच्या वतीने दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य तालीम मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शक सुखदेव दादा बुध्याळकर, अध्यक्ष प्रवीण बनसोडे, माजी अध्यक्ष पंकज आठवले, उपाध्यक्ष गौतम शिवशरण, अशोक शिवशरण, खजानिस सुरेश आठवले, शिवराम बुधाळकर, रंगनाथ शिवशरण, चेतन कांबळे, तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मंडळाच्या महिला कमिटी व भागातील सर्व महिलांच्या वतीने यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

या कार्यक्रमाला भागातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या सविता नागटिळे, मीना कांबळे, संगीता चक्रे, तसेच मंडळाच्या महिला सभासद शोभा बुध्याळकर, सपना बनसोडे, रूपाली आठवले, ज्योती आठवले, ज्योती जोगडे ,(बुध्याळकर), राणी सावंत, उर्मिला शिवशरण, अश्विनी शिवशरण, रेश्मा बुधाळकर,सीता बुध्याळकर, ऋतुजा शिवशरण, तसेच इतर महिला मोठ्या प्रमाणात व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!