कै. कांता आप्पा शेट्ये यांच्या शोकसभेचे आयोजनखारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र व सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती व प.पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पत संस्था खारेपाटण चे संस्थापक अध्यक्ष श्री सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये यांचे नुकतेच दी.४ फेब्रुवारी २०२५ रोजी निधन झाले होते. तरी त्यांचा भावपूर्ण श्रद्धाजली व शोकसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण ग्रामस्थ व कांता आप्पा प्रेमीच्या वतीने शुक्रवार दी.१४/२ फेब्रुवारी २०२५ रोजी शेठ न म.विद्यालय खारेपाटण च्या सभागृहात दुपारी ठीक ३.०० वाजता करण्यात आले असून या शोक सभेच्या कार्यक्रमाला दशक्रोशितील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन खारेपाटण ग्रामपंचायत,खारेपाटण पतपेढी, खारेपाटण सोसायटी,खारेपाटण शिक्षण संस्था व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.













